Video | काका-पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहीजे....रितेश देशमुख भावूक झाले म्हणाले की....

Video | काका-पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहीजे….रितेश देशमुख भावूक झाले म्हणाले की….

| Updated on: Feb 18, 2024 | 4:42 PM

बरेच लोकं असा विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल ? परंतू विलासराव आणि दिलीपराव यांनी कधीच असा विचार केला नाही... उलट आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो? त्याला साथ कशी देऊ शकतो ? हीच भावना त्यांनी जपल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले. विलासराव गेल्यानंतर आपले काका नेहमीच मागे उभे राहीले, गरज असेल तरी मी आहे, गरज नसेल तरी मी आहे असे त्यांनी आश्वस्त केल्याचे रितेश यांनी आपल्या काकांबद्दल प्रेम व्यक्त करताना सांगितले.

लातूर | 18 फेब्रुवारी 2024 : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याच्या जोड्या कायम चर्चेत राहील्या आहेत. लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. यावेळी रितेश देशमुख यांनी आपल्या वडीलांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्यावेळी विलासरावांना त्यांच्या वडीलांनी ( रितेश यांचे आजोबा ) राजकारणात कोणावर व्यक्तीगत टीका कोणावर करू नका असा सल्ला दिल्याची आठवण सांगितली. विलासरावांनी ते तत्व नेहमी सांभाळल्याचे यावेळी रितेश यांनी सांगितले. विलासराव यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे बंधूप्रेम कसे होते हे देखील त्यांनी सांगितले. त्यांचा वारसा भैया आणि धीरज चालवित आहे.आज भाषणांची पातळी किती खालच्या दर्जावर गेली असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तो काळ परत आणण्याची गरज असल्याचे रितेश यावेळी म्हणाले. विलासराव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा प्रथम लातूरला आले, तेव्हा मांजरा साखर कारखान्यावर त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता. तेव्हा साहेब देवळात नाही गेले. पहिल्यांदा स्टेजवर आले आणि दादांच्या ( दिलीपराव देशमुख ) पायावर डोकं टेकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि भाषण सुरु केले. परंतू त्यांना अश्रू आवरेणात ते शांत उभे राहीले. त्यावेळी दादांना त्यांना, ‘यु कॅन डू इट’ म्हणत आधार दिला. आज साहेबांना जाऊन 12 वर्षे झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते हे सांगताना रितेश यांना अश्रू अनावर झाले. पण ही उणीव भासू नये म्हणून म्हणून आपले काका नेहमीच मागे उभे राहील्याचे त्यांनी सांगितले. आज सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असले पाहीजे याचे ज्वलंत उदाहरण तुमच्या पुढे असल्याचे रितेश यांनी सांगितले.

 

Published on: Feb 18, 2024 04:40 PM