नाशिकच्या धरण क्षेत्रात वरूण राजाची कृपा; केळझर धरण ‘ओव्हर फ्लो’ अन् बळीराजा सुखावला
VIDEO | शेतकऱ्यांना दिलासा, नाशिकच्या बागलाणचे गोपाळसागर केळझर धरण 'ओव्हर फ्लो'
नाशिक, ६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. मात्र नाशिक जिल्ह्यात त्या तुलनेत फारसा पाऊस पडला नाही. दरम्यान, नाशिकच्या ग्रामीण भागात वरुण राजाने पाठ फिरवली असली तरी काही धरणांच्या उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील मोसम तसेच बागलाण तालुक्यासाठी आरम वरदान ठरलेल्या मुल्हेर, ताहराबाद पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने गोपाळसागर केळझर धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आरम नदी वाहू लागली आहे. गोपाळसागर केळझर धरण ओसंडून वाहत असल्याने हरणबारी लाभ क्षेत्रातील आरम खोऱ्यातील नदी काठच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Published on: Aug 06, 2023 03:28 PM
Latest Videos