Kalyan Dombivli Potholes : हे रस्ते म्हणायचे की चाळण… कल्याण-डोंबिवलीतील या रस्त्याची दुर्दशा एकदा बघाच
सर्वत्र झालेले खड्डे एमएसआरडीसी बुजवत नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे एकीकडे अपघात होत आहे, तर खड्डे वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने जात असलेल्या वाहनांचा देखील अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीसह महापालिकेच्या अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी नव्हे तर महापालिकेच्या अंतर्गत रस्त्याची देखील या पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे. सर्वत्र झालेले खड्डे एमएसआरडीसी बुजवत नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे एकीकडे अपघात होत आहे, तर खड्डे वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने जात असलेल्या वाहनांचा देखील अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिकेकडून खड्डे बुजवण्याचा दावा केला जातोय, मात्र हा दावा फक्त कागदोपत्री असल्याने महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली आहे. शहरातील खड्डे बुजवण्याचा काम सुरू असल्याचे पालिका अधिकारी सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात पालिका कार्यालयाबाहेरच खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र व कल्याण मधील ब प्रभाग कार्यालया बाहेर दिसून येत आहे. याच रस्त्याने प्रभाग अधिकारी या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रभाग कार्यालय परिसरातील रस्ते अर्ध्या ते एक किलोमीटर पर्यंत खड्डेमय झालेला दिसून येत आहेत.