पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! चांदणी चौकाच्या उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण, वाहतूक कोंडीतून सुटका
VIDEO | पुणेकरांना दिलासा... चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण, वाहतूक कोंडीतून अखेर सुटका
पुणे, ९ ऑगस्ट २०२३ | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याचे काम आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच पुणेकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी या पुलाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकार्पण करण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, पुणे सातारा मार्ग, तसेच कात्रज येथे जाण्यासाठी हा मार्गाचा वापर अधिक केला जातो. या मार्गावरूनच मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते म्हणून येथे वाहतूक कोंडी नेहमी होत होती. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन रस्ता तयार करण्यात आला. येत्या शनिवारी चांदणी चौक मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार असून त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहे.
Published on: Aug 09, 2023 03:05 PM
Latest Videos