Rohit Pawar यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं, म्हणाले, '...मग तीन महिने काय केलं?'

Rohit Pawar यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं, म्हणाले, ‘…मग तीन महिने काय केलं?’

| Updated on: Sep 23, 2023 | 5:29 PM

VIDEO | शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चांगलेच खडसावले, काय केली सडकून टीका बघा?

ठाणे, २३ सप्टेंबर २०२३ | शिवसेनेच्या अपात्र आमदारांची सुनावणी आता सुरू करण्यात आली आहेत, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत असतील तर मग तीन महिने काय केलं? याचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारलं आहे. तर राहुल नार्वेकर यांचा आदर आहे. पण अध्यक्षांची जबाबदारी पक्षाच्या बाजूने नसते तर ती राज्याच्या बाजूने असली पाहिजे. राज्याचे हित लक्षात घेता त्यांनी योग्य निर्णय वेळेत द्यायला पाहिजे, असेही रोहित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारले. राहुल नार्वेकर हे स्वाभिमानी राज्याचे अध्यक्ष असताना त्यांना दिल्लीमध्ये जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागतंय, ही दुर्दैवी बाब असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी खोचक टोलाही लगावला आहे.

Published on: Sep 23, 2023 05:29 PM