Rohit Pawar यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा; म्हणाले, ‘… तर राजीनामा दिलाच पाहिजे’
VIDEO | मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी', अशी मागणी रोहित पवार यांनी नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात केली.
नंदुरबार, ५ सप्टेंबर २०२३ | ‘जालना येथील लाठीचार्जच्या घटनेवर सरकारने माफी मागितली म्हणजे सरकारने चूक केल्याचे मान्य केले आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी रोहित पवार यांनी नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात केली. सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने माफी मागितली म्हणजे त्यांनी आपली कबुली दिली आहे. सरकार एकीकडे माफी मागत आहे. मात्र संबंधित मंत्री अजूनही राजीनामा देत नसल्याने सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सरकारने अधिकाऱ्यांचा मार्फत या घटनेची चौकशी करण्यापेक्षा या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानमार्फत चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.’ ते नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीच्या संदेश साहेबांच्या या यात्रेसाठी आले होते त्यावेळी त्यांनी ही टीका केली.