Ajit Pawar यांना समर्थन दिलं तरच निधी? काय होताय ब्लॅकमेलिंगचे आरोप? ‘या’ नेत्यांचे बाईट व्हायरल
VIDEO | अजित पवार गटात सामील होण्यासाठी आमदारांवर होतोय निधीचा दबाव? अजित पवार यांनी समर्थन देण्यासाठी काय होताय ब्लॅकमेलिंगचे आरोप? समर्थन दिलं तरच निधी? आरोप-प्रत्यारोपांचं घमासान
मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | आमदारांनी समर्थन द्यावा यासाठी निधीचा दबाव आणला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. अजित पवार गटानं हे आरोप फेटाळले. मात्र त्यानंतर आमदार किरण लहामटे आणि आमदार राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांना पांठिबा देतेवेळी काय म्हटलं होतं त्याचे बाईट्स व्हायरल झाले आहेत. अजित पवार गटात सामील होण्यासाठी आमदारांवर निधीचा दबाव आहे का? हा प्रश्न रोहित पवारांच्या आरोपांनी पुन्हा चर्चेत आलाय. शरद पवार गटाच्या आमदारांना निधीसाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला आहे तर रोहित पवार अकाली प्रौढ झाल्याचं सुनिल तटकरे म्हणतायत. या आरोपांनंतर अजित पवार गटात गेलेले बुलडाण्याच्या सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि नगरच्या अकोलेचे आमदार किरण लहामटे या दोन्ही आमदारांच्या प्रतिक्रिया व्हायरल होतायत. काय म्हणाले हे दोघं नेते बघा स्पेशल रिपोर्ट