देवेंद्र फडणवीस बोलले तो गौप्यस्फोट नव्हे तर…; रोहित पवार यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरही रोहित पवार बोललेत. पाहा...
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस जे बोलले तो गौप्यस्फोट नव्हता.तर त्यांचं ते राजकीय वक्तव्य आहे, असं रोहित पवार म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही आदराने बघतो. 2019 ला ते म्हणाले होते काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. त्यामुळे आधी ते वेगळ्या दृष्टिकोनातून बोलत असावे. नंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला असावा. फडणवीस यांचं वक्तव्य खरं नसून राजकीय वक्तव्य असू शकतं, असं रोहित पवार म्हणालेत. सहानुभूती मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे, असंही ते म्हणालेत. या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे गटाचा विजय होईल, असा मला विश्वास आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.