गोपीचंद पडळकर चॉकलेट बॉय!; रोहित पवार असं का म्हणाले?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'चॉकलेट बॉय' असा केला आहे. ते पिंपरीत बोलत होते. त्यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावरही टीका केलीय. पाहा...
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख ‘चॉकलेट बॉय’ असा केला आहे. ते पिंपरीत बोलत होते. “कोण पडळकर, ते चॉकलेट बॉय? एसटी कर्मचारी असो की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. ते रात्री ही सहभागी होतात. अगदी तिथंच झोपतात. सत्कार करून घेतात, विजयी मिरवणूक काढतात. हे चॉकलेट बॉय स्वत:च्या प्रसिद्धीसाठी काहीही करतात. त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपणच ठरवायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी पडळकरांवर टीकास्त्र डागलंय. “अमित शाह हे खूप हुशार आहेत, त्यांचा अभ्यास खूप आहे. त्यामुळे ते पुण्यात येतात पण कसबा आणि चिंचवडचा प्रचार करत नाहीत. याचा अर्थ भाजपचा सर्व्हे निगेटिव्ह आहे. इथल्या पराभवाने प्रतिष्ठित नेत्यांचं नाव खराब होऊ नये, हे त्यामागचं कारण आहे. म्हणूनच चिंचवड आणि कसब्यामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे हे उघड आहे”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.