Video : उद्या विधानपरिषद निवडणूक, मविआची तयार कुठपर्यंत? रोहित पवार म्हणाले…
उद्या राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी तयारी जोरदार सुरू आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि भाजप अशी दोन्हींकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दोन्हीकडून विजयाचे दावेही केले जात आहेत. या निवडणुकीबाबतच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विधान परिषदेचं गणित हे क्रिकेटच्या भाषेत समजावून […]
उद्या राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी तयारी जोरदार सुरू आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आणि भाजप अशी दोन्हींकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दोन्हीकडून विजयाचे दावेही केले जात आहेत. या निवडणुकीबाबतच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विधान परिषदेचं गणित हे क्रिकेटच्या भाषेत समजावून सांगितलं आहे. तसेच एखादी मॅच हरतो त्यातून शिकावं लागलं. पीच तेच, प्रतिस्पर्धी तेच आहे. त्यामुळे आपण सर्व काळजी घेऊ, पण भाजपवाले नक्की थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात. मविआ चिडली असं ते म्हणू शकतात. किंवा मत बाद करु शकतात, असे म्हणत त्यांनी राज्यसभेच्या मतदानावेळी घेतलेल्या आक्षेपावरही भाष्य केलं आहे. त्याची पुन्हा पुरावृत्ती होऊ शकते, असा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवला आहे.