आमचा बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी…; रोहित पवार यांचं सूचक ट्विट

| Updated on: Mar 26, 2023 | 12:52 PM

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर होणारी कारवाई अन् सत्ताधारी पक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी टीका केलीय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर होणारी कारवाई अन् सत्ताधारी पक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलंय. ट्विट करत त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र डागलंय. “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी तो आवाज दाबला जात नाही,हा इतिहास आहे.आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक असून हेच आवाज उद्याच्या सक्षम आणि सुरक्षित लोकशाहीची पायाभरणी करतील यात कुठलीही शंका नाही”, असं रोहित पवार म्हणालेत.

Published on: Mar 26, 2023 12:51 PM
उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे ‘त्या’ लोकांची हातभर फाटलीय; राऊतांचा जोरदार हल्ला
बाळासाहेब आसते तर ‘हे’ सहण केल नसतं, ऊर्दु पोस्टरवरून देसाईंची सडकून टीका