18+ नागरिकांच्या लसीकरणावरून आभार माना, लसीकरण म्हणजे उपकार नाही – रोहित पवार
युजीसीच्या सूचनेला आमदार रोहित पवार यांनी विरोध केलाय. लोकांनी भरलेल्या टॅक्समधून केले जाणारे लसीकरण म्हणजे उपकार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
देशभरात 18 आणि त्यावरील नागरिकांचे मोफत लसीकरण चालू केल्याने त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार म्हणणारे फलक लावा असे आदेश यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठ, विद्यालये आणि तंत्र शिक्षण संस्थांना दिलेल्या आहेत. मात्र युजीसीच्या सूचनेला आमदार रोहित पवार यांनी विरोध केलाय. लोकांनी भरलेल्या टॅक्समधून केले जाणारे लसीकरण म्हणजे उपकार नाही तर ते कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलेलं आहे.
Latest Videos