.. पण त्यांनी प्रथा, परंपरा धुळीस मिळवली, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट पोस्ट करून विधानपरिषद उपसभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
घटनात्मक पदाची गरिमा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषद उपसभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राम शिंदे यांनी विधानमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हंटलं आहे की, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या सर्वांनीच आजवर आपल्या पदाचा मान सन्मान ठेवला. पण अलीकडच्या काळात या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय अशी शंका येते. परिषदेच्या सभापती महोदयांनी तर कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि प्रथा, परंपरा धुळीस मिळवली, अशा आशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
