रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर, ट्वीट करून काय दिला मोलाचा सल्ला?
राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद पेटलाय. अशातच रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा ज्वलंत विषयावर बोला, असे त्यांनी म्हटलंय
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद पेटलाय. अशातच रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी मोलाचा सल्ला दिलाय. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ..असे म्हणत खोचक वक्तव्य ही रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.