'खरेदीच नाही आणि म्हणे भ्रष्टाचार झाला?' विरोधी पक्ष नेत्यावर कॅबिनेट मंत्र्याचा घणाघात

‘खरेदीच नाही आणि म्हणे भ्रष्टाचार झाला?’ विरोधी पक्ष नेत्यावर कॅबिनेट मंत्र्याचा घणाघात

| Updated on: May 31, 2023 | 11:41 AM

त्यानंतर आता आणखी एका मंत्र्यावर विरोधकांनी गंभीर आरोप खुद्द विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर टॅब खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमधील सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावर कमिशनवरून राष्ट्रवादी आमदाराने आरोप केले होते. त्यानंतर आता आणखी एका मंत्र्यावर विरोधकांनी गंभीर आरोप खुद्द विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर टॅब खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला आता भुमरे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच जर टॅब खरेदी झालीच नाही तर भ्रष्टाचार झाला कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अंबादास दानवे हे विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी अशा जबाबदारीच्या पहावर आहेत. त्यामुळे त्यांनी किमान माहिती घेऊन असे आरोप करावेत. तर हा आरोप काही खरा नाही असा टोला लगावला आहे.

Published on: May 31, 2023 11:41 AM