Hyderabad | तेलंगणात पार पडला समलैंगिक जोडप्याचा शाही विवाहसोहळा

Hyderabad | तेलंगणात पार पडला समलैंगिक जोडप्याचा शाही विवाहसोहळा

| Updated on: Dec 20, 2021 | 3:34 PM

समलैंगिक जोडप्याच्या लग्नाची बातमी तेलंगणातून समोर आली आहे. भलेही हे लग्न कायदेशीर नसलं, तरिही ‘आम्ही आता ऑफिशलीअली एकमेकांचे झालो’, अशी घोषणा करत भारतातील एका समलैंगिक जोडप्यानं जंगी पार्टी दिली आहे.

समलैंगिक जोडप्याच्या लग्नाची बातमी तेलंगणातून समोर आली आहे. भलेही हे लग्न कायदेशीर नसलं, तरिही ‘आम्ही आता ऑफिशलीअली एकमेकांचे झालो’, अशी घोषणा करत भारतातील एका समलैंगिक जोडप्यानं जंगी पार्टी दिली आहे. या पार्टीचं त्यांच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे कुटुंबीयही या सोहळ्यात सहभागी होते. त्यांच्या संमतीनच हा शाही सोहळा पार पडला, ही सुंदर गोष्ट अधोरेखित करायलाच हवी! इतर लग्न सोहळ्यांसारखाच हा सोहळाही उत्साहात पार पडला. प्रेमाची ही गोष्ट स्वीकारण्यासाठी, मोठं मन लागतं. स्वीकार करण्याची वृत्ती लागते. चांगल्या आणि स्पष्ट विचारांची माणसं लागतात. हे सगळं असणाऱ्या मंडळींनी अभय आणि सुप्रियो या समलैंगिक जोडप्याच्या लग्नात धम्माल केली.