Raj Thackeray : राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, कुणाची सडकून टीका?

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, कुणाची सडकून टीका?

| Updated on: Oct 14, 2023 | 12:18 PM

VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता. यावरून आता आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, असे म्हणत त्यांनी दिलं आव्हान

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी टोलच्या दरवाढीच्या मुद्द्यांवरून मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोलच्या मु्द्दयावर आक्रमक भूमिका घेतली तर यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता. यावरून आता आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, जसं ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक टोलसाठी पैसे भरावे लागणार आहेत. तसंच आपण महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी नाशिक मार्गे आणि पुणे मार्गे जे नागरिक आहेत यांना सुद्धा तीन जागी टोल भरावा लागत आहे. आपण यासाठी सुद्धा जर मागणी केली असती तर या नागरिकांनासुद्धा एकच टोल भरावा लागाला असता, असे सचिन खरात म्हणाले.

Published on: Oct 14, 2023 12:18 PM