Ramdas Athawale | नारायण राणे यांची जी भाषा आहे, ती शिवसेनेचीच भाषा : रामदास आठवले

| Updated on: Aug 24, 2021 | 8:54 PM

नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर आज रत्नागिरी पोलिसांकडून राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना महाड पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यात आलंय. दरम्यान, राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय.