'नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडले', कुणी केला हल्लाबोल

‘नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडले’, कुणी केला हल्लाबोल

| Updated on: Mar 31, 2023 | 10:48 AM

VIDEO | 'उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही', कुणी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांना सुनावले

पुणे : शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. नरेश मस्के तुम्ही मध्यंतरी काय केलं हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. नरेश मस्के तुम्ही शिवसेना या पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला गद्दार म्हणत आहे, असे म्हणत आरपीआय अध्यक्ष सचिन खरात यांनी खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, नरेश मस्के स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा. तसेच नरेश मस्के उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सचिन खरात यांनी चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 31, 2023 10:48 AM