Railway Recruitment : रेल्वे भरतीची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, वर्षातून किती परीक्षा घेतल्या जाणार?

Railway Recruitment : रेल्वे भरतीची परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठा दिलासा, वर्षातून किती परीक्षा घेतल्या जाणार?

| Updated on: Feb 05, 2024 | 1:15 PM

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे रेल्वेने एसएससी आणि यूपीएससी प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे.

मुंबई, ५ फेब्रुवारी, २०२४ : रेल्वे भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. या वार्षिक कॅलेंडरमध्ये वर्षभरातील परीक्षांच्या तारखा देण्यात आल्या आहेत. यानुसार वर्षातून रेल्वे भरती परीक्षा या चार होणार आहेत. त्यामुळे रेल्वे भरतीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे रेल्वेने एसएससी आणि यूपीएससी प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले असून यात वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आल्या आहे. या कॅलेंडरनुसार असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारी-मार्च दरम्यान, एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती, जुलै-सप्टेंबरमध्ये, नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर ४, ५, ६ साठी भरती होईल. या कालावधीत, रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठी देखील भरती करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे श्रेणी -१(ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे.

Published on: Feb 05, 2024 01:15 PM