डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार, पण कुठे ?
VIDEO | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर, कुठे असणार भव्य प्रतिकृती
ठाणे : उल्हासनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. कॅम्प ४ परिसरात हा पुतळा बसवण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे देखील उपस्थित होते. यासाठी शासनाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित १ कोटी रुपये हे उल्हासनगर महानगरपालिकेकडून दिले जाणार आहेत. अशा २ कोटी रुपयांच्या निधीतून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. सोबतच परिसरात सुशोभीकरण देखील केलं जाणार आहे. याबाबतची माहिती आज आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.