Shahaji Patil : पाणी पुरवठा योजनेला 300 कोटींचा निधी, सांगोल्यातील 81 गावांना होणार फायदा

Shahaji Patil : पाणी पुरवठा योजनेला 300 कोटींचा निधी, सांगोल्यातील 81 गावांना होणार फायदा

| Updated on: Sep 04, 2022 | 7:00 PM

सांगोला तालुक्यातील शिरभावी उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. ही योजना पूर्ण करण्यासाठी 300 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय आगामी 15 दिवसांमध्ये या योजनेतील कामांना प्रत्यक्षात सुरवात होणार असल्याचेही पाटील म्हणाले आहेत.

सोलापूर : विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा ठपका ठेवत (Shivsena Party) शिवसेना आमदारांनी बंड केले होते. निधीबाबत कसा दुजाभाव होतो हे (Shahaji Bapu Patil) आ. शहाजीबापू पाटील यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, शिंदे सरकारच्या स्थापनेला दोनच महिने झाले आहे. या कमी कालावधीतच सरकारने सांगोलाकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. (Sangola) सांगोला तालुक्यातील शिरभावी उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. ही योजना पूर्ण करण्यासाठी 300 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय आगामी 15 दिवसांमध्ये या योजनेतील कामांना प्रत्यक्षात सुरवात होणार असल्याचेही पाटील म्हणाले आहेत. या योजनेमुळे 81 गावांचा पाणीप्रश्न तर मार्गी लागणार आहे पण अनेक रखडलेली कामही मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 04, 2022 07:00 PM