शरद पवारांची साद, महादेव जानकरांचा होकार पण शेवटी मारली पलटी

शरद पवारांची साद, महादेव जानकरांचा होकार पण शेवटी मारली पलटी

| Updated on: Mar 25, 2024 | 12:55 PM

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना त्यांच्याच खेळीत अडकवलंय. शरद पवार यांच्यासोबत जाणार अशी चर्चा सुरू असताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं

शरद पवार यांनी माढ्यातून लढण्यासाठी महादेव जानकर यांना साद घातली आहे. महादेव जानकर तयार झाली आहे तर जानकर अचानक महायुतीत परतले आणि शिंदे-फडणवीस यांची थेट गळाभेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना त्यांच्याच खेळीत अडकवलंय. शरद पवार यांच्यासोबत जाणार अशी चर्चा सुरू असताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं आणि थेट शिंदे-फडणवीसांची गळाभेट घेतली. महायुतीत नाराज असलेल्या महादेव जानकर यांना आपल्या सोबत आणण्यासाठी शरद पवार यांनी माढाची जागा देण्याची तयारी दाखवली. तर पवारांसोबत जानकरांच्या बैठकाही झाल्या होत्या. मात्र रविवारी जानकर थेट वर्षावर दाखल होत शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीनंतर आपण महायुतीत होतो आणि राहणार असल्याचे जानकर म्हणाले.

Published on: Mar 25, 2024 12:54 PM