Sharad Pawar Resigns | 'पवार साहेबांची निवृत्ती म्हणजे आमची हानी, आम्हाला मार्गदर्शनाची गरज'

Sharad Pawar Resigns | ‘पवार साहेबांची निवृत्ती म्हणजे आमची हानी, आम्हाला मार्गदर्शनाची गरज’

| Updated on: May 03, 2023 | 9:07 AM

VIDEO | 'शरद पवारांनी महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात राहावं', 'या' नेत्यानं केली विनंती

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहावं, आम्हाला शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर शरद पवार साहेबांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी आहे’, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षांचा निर्णय असेल. पण शरद पवार असा निर्णय घेणार नाही. तर बदल स्विकारला पाहिले आणि शरद पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे अजित पवार म्हणाले, यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, ‘शरद पवार यांचा आदेश अजित पवार मानणार आहे. अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत त्यामुळे त्यामध्ये ते भाडणं लावताय असं नाही. शरद पवारांच्या विरोधात अजित पवार कधीच भूमिका घेणार नाही, शरद पवार असा निर्णय घेणं म्हणजे खरंच आमची हानी आहे.’, असेही त्यांनी म्हटले.

 

Published on: May 03, 2023 09:01 AM