Ratnakar Gutte : ‘दम असेल तर या तुमचे कपडे फाडून…’, रत्नाकर गुट्टे यांनी कोणाला दिलं ओपन चॅलेंज?
रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेना खासदार संजय जाधव यांचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बघा नेमकं काय म्हणाले?
गंगाखेडचे आमदार आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि परभणीचे खासदार संजय जाधव या दोघं नेत्यांमध्ये नेहमीच जुंपत असल्याचे पाहायला मिळतेय. नुकताच रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेना खासदार संजय जाधव यांचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान विकासाच्या मुद्द्यावरच बोलत असताना विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे ते माझ्यावर वैयक्तिक टीका केली असल्याचे रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले. त्यावेळी संजय जाधव तर माझे धोतर फेडतो असे जाहीर म्हणत होते. पण मी आता त्यांना थेट चॅलेंज करतो असं रत्नाकर गुट्टे म्हणाले. ‘दम असेल तर या तुमचे कपडे फाडून पाठवतो’, असं गुट्टे म्हणाले. तर ‘खासदार साहेब या आणि माझे धोतर फेडून दाखवा नाही तुमची पॅन्ट फाडून तुम्हाला वापस पाठवले तर नावाचा रत्नाकर गुट्टे नाही. निवडणुका झाल्यानंतर आता शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. पण आता मी त्यांच्या कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारचा थारा देणार नाही, असेही रत्नाकर गुट्टे म्हणाले.