वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी आता नवा नियम
नव्या नियमांमुळे नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना काढताना वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरटीओनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चाळीशी नंतर वाहन परवाना काढायचा असल्यास डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरटीओ कडून डॉक्टरांना लॉगिन आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. नागरिकांना सुदृढ असे पर्यंत वाहन चालवण्याचा परवाना काढता येणार आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आरटीओ विभागानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या नियमांमुळे नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना काढताना वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. चाळीस वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना इथून पुढं वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन चालवण्याचा परवाना हवा असल्यास नव्या नियमाचं पालन करावं लागणार आहे.
Latest Videos