Breaking | 11 देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

| Updated on: Sep 01, 2021 | 7:49 PM

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : कोविड-१९ विषाणूचे नवीन आणि वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, भारतात येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार, जे आंतरराष्ट्रीय प्रवासी यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे. सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून खालील नमूद केल्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.