Rajesh Tope | दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी RTPCR टेस्ट करणे बंधनकारक; राजेश टोपेंची माहिती
विमान प्रवास करुन आलेल्यांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचं स्क्रिनिंग सुरु आहे. ओमिक्रॉन विषाणूचं संसर्ग प्रमाण अधिक असेल तर त्या देशातील विमानं बंद केलेली बरी, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली.
मुंबई : राज्य सरकारने विमानसेवेसंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. ठराविक विमानसेवा बंद करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी. परिस्थितीबाबतची माहिती केंद्राला दिली आहे. देशात ह्या प्रकारचा व्हेरिएंट सापडलेला नाही. आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी 72 तासांची आरटीपीआर टेस्ट अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं पूर्णतः बंद करायला पाहिजेत. आफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर बंधनकारक असेल. नमुने तपासण्याचं काम सुरु आहे. आपल्याला सतर्क रहावं लागेल. विमान प्रवास करुन आलेल्यांची कोरोना तपासणी सुरु केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचं स्क्रिनिंग सुरु आहे. ओमिक्रॉन विषाणूचं संसर्ग प्रमाण अधिक असेल तर त्या देशातील विमानं बंद केलेली बरी, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली.
Latest Videos