Kalyan Shivsena : कल्याणमध्ये श्रेयवादावरून शिंदेंच्या शिवसेनेतच राडा, महिला कार्यकर्ता अन् माजी नगरसेवक भर रस्त्यात भिडले
कल्याणमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून शिंदे गटाचे शिलेदार आमनेसामने आले असून भर रस्त्यात एकच गोंधळ पाहायला मिळाला. महिला कार्यकर्ता राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली
कल्याणमध्ये श्रेयवादावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयवादावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. भर रस्त्यात महिला कार्यकर्त्या आणि माजी नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. महिला कार्यकर्ता राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात हा वाद झाला. भर रस्त्यामध्ये झालेल्या या राड्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा आहे. दरम्यान, महिला कार्यकर्ती राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात उद्घाटन कार्यक्रमावरून हा राडा झाल्याची चर्चा आहे. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान, महिला कार्यकर्ता राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या समर्थकांमध्ये उद्घाटन कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सुपुत्र वैभव भोईर यांच्या समोरच हा वाद झाल्याने त्यांनी घाईघाईने कार्यक्रमस्थळ सोडल्याची माहिती मिळतेय. तर एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील भर रस्त्यावर झालेल्या या राड्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा होतेय.तर या वादामुले पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
