जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी चिमुकलीनं आपला वाढदिवस साजरा न करता केली रूद्राभिषेक पूजा
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून चिमुकलीनं देवाला प्रार्थना केली आहे. नाशिकमधील या चिमुकलीने आपला वाढदिवस साजरा न करता त्याच दिवशी जरांगे पाटील यांच्या स्वास्थ्यासाठी रुद्राभिषेक पूजा केली.
नाशिक, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषणाला ते बसले आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचा आठवा दिवस असून त्यांनी सरकारकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्या, अशी मागणी लावून धरली आहे. सलग आठव्या दिवशी त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभावं तसेच त्यांच्या स्वास्थ्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी नाशिकमध्ये सात वर्षांच्या चिमूरडीने आपला वाढदिवस असताना तो साजरा न करता मनोज जरांगे पाटील यांच्या स्वास्थ्यासाठी रुद्राभिषेक पूजा केली. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.