कांद्याच्या घसलेल्या दरामुळे जगायचं कसं? शेतकऱ्यापुढं प्रश्न, पण काद्याचं गणित नेमकं बिघडलं कसं? बघा Tv9 मराठीचा रिपोर्ट
VIDEO | कांद्याच्या दरामुळे आता जगायचं कसं, असा शेतकऱ्यासमोर प्रश्नतर दुसऱ्या बाजूला कांद्यावरुन सत्ताधारी-विरोधक राजकारणात मश्गुल, बघा Tv9 मराठीचा रिपोर्ट
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, आज कांद्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आक्रमक झालेल्या विरोधकांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. त्यावर आक्षेप घेत गेल्यावर्षीची आकडेवारी सरकारनं सांगितल्याचा आरोप विरोधकांनी केला. घसरलेल्या कांद्याचा भावाचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजताना दिसतोय. मातीमोल भावामुळे कुठे शेतकरी कांद्याच्या पिकावर गुरांना सोडतायत. तर कुठे रस्यांवर कांदे फेकून आंदोलनं होतायत. मात्र कांद्याचा भाव नेमका कशामुळे पडला बघा Tv9 मराठीचा रिपोर्ट
Published on: Feb 28, 2023 11:26 PM
Latest Videos