Akola जिल्ह्यात नंदी आणि गणपती दुध पित असल्याच्या चर्चा, मंदिरात भाविकांची गर्दी
मूर्ती पाणी दूध पीत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होतोय. त्यात दगडाची मूर्ती पाणी दूध पीत नाही ते पाणी आणि दुध मूर्ती वरून खाली उतरत आहे. खालील भाग ओला झाल्याचा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कार होतो यावर विश्वास ठेवणार लोक स्वतःची माझी फसवणूक करत आहे हे समजून घ्यायला पाहिजे असेही केदार यांनी म्हटले आहे.
अमरावतीमध्ये नंदी बैल दुध आणि पाणी पीत असल्याचा दावा
अमरावती जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावातील महादेवाच्या मंदिरातील नंदी बैल दुध आणि पाणी पीत असल्याचा दावा ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे. नंदीबैल दुध आणि पाणी पीत असल्याचे तसे अनेक व्हिडीओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तळेगाव ठाकूर ,अचलपूर सह आदी गावांमध्ये असे प्रकार समोर आले असून नंदी बैलाला दूध पाजण्यासाठी मंदिरात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणते अंधश्रद्धा निर्मूलन समिती.?
यापूर्वी 21 सप्टेंबर 1995 ला देशभरातील गणपती दूध पीत असल्याचा खोटेपणा दिवसभर चालला होता असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्ह्याचे सचिव हरीश केदार यांनी म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे केशाआकर्षणाच्या नियमातून घडत असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली आहे. परत 27 वर्षांनी ही खोटी बाब पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. देव आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांना हात घालून अंधश्रद्धा पसरविण्याचा हा प्रकार असल्याचेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.
मूर्तीवरून दूध आणि पाणी खाली उतरत आहे
नंदीची मूर्ती पाणी दूध पीत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होतोय. त्यात दगडाची मूर्ती पाणी दूध पीत नाही ते पाणी आणि दुध मूर्ती वरून खाली उतरत आहे. खालील भाग ओला झाल्याचा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कार होतो यावर विश्वास ठेवणार लोक स्वतःची माझी फसवणूक करत आहे हे समजून घ्यायला पाहिजे असेही केदार यांनी म्हटले आहे.
चमत्कार सिद्ध करा २५ लाख मिळवा
वारंवार अशा अफवांचे प्रकार घडत आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे. सीबीआयने या प्रकाराची चौकशी करावी असा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हा चमत्कार सिद्ध करून लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये मिळवा हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षापासून देत आहे. ज्यांना वाटतं नंदीची मूर्ती पाणी दुध पीत आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये जादू विरोधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.