Rupali Chakankar : नेमकं दोषी कोण? ‘पेशंटला मोठा रक्तस्त्राव, साडेपाच तास उपचारच नाही’, चाकणकरांकडून मोठी अपडेट
10 लाखांची मागणी कऱण्यात आल्यानंतर संबंधित रुग्णालयाला विविध विभागांकडून मंत्रालयातून फोन करण्यात आले मात्र रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात कोणतीच दखल घेतली नसल्याचेही रुपाली चाकणकर यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर करण्यात आला. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मंगेशकर रूग्णालय हे दोषी असल्याचे सांगितले. रुग्णाची वैयक्तिक माहिती रुग्णालयाने अहवालात दिल्याचे सांगत रूपाली चाकणकर म्हणाल्या, “28 तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पेशंट गेला. 9 वाजून 1 मिनिटांची एन्ट्री दिसत आहे. पेशंटला डॉक्टरांनी 2 तारखेला बोलावलं होतं. पण हेवी ब्लिडिंग होतय म्हणून पेशंट 28 तारखेलाच रूग्णालयात गेला. पेशंटचा डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संबंधित स्टाफला डिलिव्हरीच्या ऑपरेशनची तयारी करा, अशी सूचना दिली. मात्र पेशंटला ऑपरेशनला घेऊन जाण्याआधी 10 लाखाची मागणी रूग्णालयाकडून केली. त्यावर कुटुंबाने आता तीन लाख रुपये आहेत ते घ्या. पुढच्या दोन-चार तासात किंवा उद्यापर्यंत व्यवस्था करतो असं सांगितलं. हे सगळं रूग्णासमोरच घडत असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.
पुढे त्यांनी असेही सांगितले, “9 वाजताची एन्ट्री असलेला पेशंट 2.30 वाजता रुग्णालयातून बाहेर पडला. पेशंट साडेपाच तास रुग्णालयात असताना हॉस्पिटलमध्ये कोणतेही उपचार झाले नाहीत. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर पेशंटला सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांनी लगेच उपचारासाठी आतमध्ये घेतलं” अशी माहिती रुपाली चाकणकर यांच्याकडून देण्यात आली.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक

'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...

'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं

हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
