Rupali Chakankar : '...तर ते इतके दिवस गप्प का?', रूपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल

Rupali Chakankar : ‘…तर ते इतके दिवस गप्प का?’, रूपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल

| Updated on: Jan 05, 2025 | 4:57 PM

रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल रूपाली चाकणकर यांनी केला.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल रूपाली चाकणकर यांनी केला. ‘संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या मोर्चामध्ये अजित दादांना क्या हुआ तेरा वादा…म्हणून प्रश्न विचारला., असं रुपाली चाकणकर म्हणाल्या तर तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जर सुरेश धस यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते.. आजपर्यंत तुमचा संजय सिंघानियाच होता का? असा सवालही रूपाली चाकणकर यांनी केला.

Published on: Jan 05, 2025 04:56 PM