महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची गृहखात्यावर नाराजी, काय कारण?
VIDEO | विदेशातील नोकरीचे ऑफर असल्याचे सांगत राज्यातील अडीच हजार महिलांची फसवणूक, काय म्हणाल्या महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गृह खात्यावरती नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतके वेळ पोलीस स्टेशनला बसवावं लागतं, त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली हे दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर तक्रार जर दाखल करून घेत नसेल तर निंदनीय याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस जाहीर सभांमधून एखाद्या महिलेवर टीका करताना अतिशय पातळी सोडून भाषा वापरण्याचं प्रमाण वाढलेय. यासंदर्भात महिलांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देत असल्याच त्यांनी सांगितलं. यावेळी रुपाली चाकणकर यांनी चांगल्या पगाराच्या विदेशाील नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात येणाऱ्या या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी या प्रकारात लक्ष देऊन केंद्र सरकारच्या मदतीने त्या महिलांची सुटका करावी, अशी मागणी केलीय.