Rupali Chakankar | निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का? :रुपाली चाकणकर

Rupali Chakankar | निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का? :रुपाली चाकणकर

| Updated on: Sep 11, 2021 | 3:20 PM

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती.

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का..?  समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसावी , कायद्याचे राज्य असले तरी माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्ञ श्वापादांचा नायनाट व्हावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने एकत्र यावे, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.