Rupali Chakankar | गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे : रुपाली चाकणकर

| Updated on: Dec 19, 2021 | 8:03 PM

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत कारवाईचा इशारा दिलाय. गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला आहे.

पुणे : राज्यात नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुलाबरावांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत कारवाईचा इशारा दिलाय. गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांना इशारा दिला आहे. गुलाबरावांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचं सांगतक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. तर खडसे यांनीही पाटील यांना उत्तर देताना काम केलं म्हणून जनतेनं आपल्याला निवडणूक दिलं, असा पलटवार केला. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.