Pune | रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम; अजित पवारांच्या उपस्थितीत करणार NCP मध्ये प्रवेश
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) पुण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केलाय.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) पुण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केलाय. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं कळतंय. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज आणि पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.