Special Report | पुण्यात राज ठाकरेंसमोर आव्हान
रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवा निर्माण सेनेला रामराम केल्यानंतर आता मनसेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीता पक्ष संगठन बळकट करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत.
रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवा निर्माण सेनेला रामराम केल्यानंतर आता मनसेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीता पक्ष संगठन बळकट करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली. खळखट्याक करणाऱ्या नेत्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळखलया जात होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना त्यांनी पक्ष सोडल्याचा फटका मनसेला बसणार आहे. पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असतानाच राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली पक्षातील नाराजी नेत्यांवर असलेली नाराजी उघड केली. पक्षातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज असल्याचे सांगत , या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे.