आपली जाऊ खासदार होणार याचा…, रूपाली ठोंबरे पाटलांचा कुणावर रोख?
'सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरं गरळ ओकायला लागली आहेत. आधी अजित पवार यांच्या बंधूने गरळ ओकली. आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास', रुपाली ठोंबरे पाटील यांनी शर्मिला पवार यांच्यावर हल्लाबोल
अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी तर अख्खा इंदापूर पिंजून काढत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली. सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरं गरळ ओकायला लागली आहेत. आधी अजित पवार यांच्या बंधूने गरळ ओकली. आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे. त्यांना द्वेष वाटत आहे. शर्मिलाताईंना विनंती आहे की, त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशाराच रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे. शर्मिला पवार यांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शर्मिला पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.