Special Report | Vladimir Putin यांना Ukraineची ‘कीव’ नाही ! -tv9
यूक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु आहेत. काळ्या समूद्राजवळील ओडेस्साजवळ टँक दिसत आहेत. रशियानं कीववर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
यूक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु आहेत. काळ्या समूद्राजवळील ओडेस्साजवळ टँक दिसत आहेत. रशियानं कीववर ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. रशियाचे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी यूक्रेननं नवीन डाव खेळलाय. यूक्रेनच्या आर्मीनं एक पूल उडवून दिला आहे. त्यामुळं रशियाचं सैन्य कीवमध्ये पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना पहिल्या दिवशी तोंड दिल्यानंतर यूक्रेननं देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवातकेलीय. राजधानी कीवमध्ये भीषण लढाई होण्याची शक्यता आहे. यूक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून आक्रमक प्रतिहल्ले केले जात आहेत. यूक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार सात एअरक्राफ्ट पाडले आहेत. हल्ले प्रतिहल्ल्यांनी कीव हादरुन गेलंय.
Latest Videos