राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न, रशियाचा मोठा दावा
VIDEO | रशियाची राजधीनी मॉस्कोच्या क्रेमलिनमध्ये ड्रोन हल्ला, राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल रशियाने काय केला दावा?
मुंबई : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. असा मोठा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. रशियाची राजधीनी मॉस्कोच्या क्रेमलिनमध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. क्रेमलिनमध्ये झालेल्या या ड्रोन हल्ल्यात रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे थोडक्यात बचावले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव झपाट्याने वाढल्याचे समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मारण्यासाठी युक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ला केल्याचे रशियाने म्हटले. मात्र, तो हल्ला रशियन सैन्याने हाणून पाडला आहे. रशियन सैन्याने युक्रेनचे ड्रोन पाडले आहे. आता क्रेमलिनने युक्रेनला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना दहशतवाद्यांप्रमाणे मारण्यासाठी युक्रेनने ड्रोन पाठवल्याचा दावा रशियन सरकारने केला आहे. क्रेमलिनने बुधवार, ३ मे रोजी एका निवेदनात म्हटले आहे, “युक्रेनने आज ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचे कृत्य म्हणजे “दहशतवादी हल्ला” आहे.