राष्ट्रपती झेलेन्स्कींनी देश सोडल्याचा दावा युक्रेनने फेटाळला

राष्ट्रपती झेलेन्स्कींनी देश सोडल्याचा दावा युक्रेनने फेटाळला

| Updated on: Mar 05, 2022 | 11:49 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. याचदरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी देश सोडल्याचा दावा रशियन मीडियाने केला होता. झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडले असून, ते पोलंडच्या अश्रयाला गेल्याचे मीडियाने म्हटले होते. मात्र रशियन मीडियाचा दावा शनिवारी युक्रेनने फेटाळून लावला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. याचदरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी देश सोडल्याचा दावा रशियन मीडियाने केला होता. झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडले असून, ते पोलंडच्या अश्रयाला गेल्याचे मीडियाने म्हटले होते. मात्र रशियन मीडियाचा दावा शनिवारी युक्रेनने फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की यांनी देश सोडला नसून, ते युक्रेनमध्येच असल्याचे युक्रेन प्रशासनाने म्हटले आहे.