रशियाचा मोठा डाव, वोलोदिमीर झेलेन्स्की यांना हटवणार? पुतीन यांच्या जवळच्या व्यक्तीला संधी देणार?
वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांच्या जागी यानुकोव्हिच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे. यानुकोव्हिच हे यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष होते. यानुकोव्हिच हे रशियाधार्जिणे आहेत. तर, वो
नाटो सदस्य देशात यूक्रेननं सहभागी होऊ नये ही भूमिका रशियाची होती. तर, दुसरी भूमिका ही यूक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात यावं ही आहे. या दोन भूमिका घेऊन रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांच्या जागी यानुकोव्हिच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे. यानुकोव्हिच हे यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष होते. यानुकोव्हिच हे रशियाधार्जिणे आहेत. तर, वोलेदिमीर झेलेन्स्की हे यूरोपियन देशांच्या बाजूनं झुकलेले आहेत. त्यामुळं एकेकाळी देश सोडून पळून जाणाऱ्या यानुकोव्हिच यांना रशियाला युक्रेनचं अध्यक्ष बनवायचं आहे.
Latest Videos