Russia Ukraine Fast News | Russia-Ukraine संदर्भातील बातम्या | 7 PM 1 March 2022

Russia Ukraine Fast News | Russia-Ukraine संदर्भातील बातम्या | 7 PM 1 March 2022

| Updated on: Mar 01, 2022 | 8:10 PM

रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये (European Union) संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर यूक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी मंगळवारी यूरोपीय यूनियनमध्ये (European Union) संबोधित केलं. आपल्या संबोधनात दरम्यान जेलेन्स्की भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या संबोधनात जेलेन्स्की म्हणाले की स्वत:ला यूरोपियन यूनियनमध्ये पाहून आनंद झाला. आपल्याला इथं येण्यासाठी एवढी किंमत मोजावी लागेल हा विचार केला नव्हता. रशिया आमच्या रहिवासी भागाला निशाणा बनवतोय. आम्ही हजारो यूक्रेनी नागरिकांना गमावलं आहे, अशी खंत जेलेन्स्की यांनी व्यक्त केलीय. महत्वाची बाब म्हणजे यूरोपियन यूनियनमध्ये जेलेन्स्की यांना संबोधनानंतर स्टॅन्डिंग ओवेशन मिळाली. इतकंच नाही तर जेलेन्स्की यांनी आपल्या संबोधनात आपला निर्धार स्पष्ट केला. ‘आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी! शहरं ब्लॉक असली तरी आम्हाला कुणीच तोडू शकत नाही, आम्ही कणखर आहोत! आम्ही युक्रेनियन्स आहोत!’, अशा शब्दात जेलेन्स्की यांनी यूक्रेन आपल्या मतांवर ठाम असल्याचं म्हटलंय. तसंच आमचे सैनिक मैदानात मजबुतीने टिकून आहेत. यूक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यूक्रेन आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय. आम्ही रशियासमोर गुडघे टेकणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय.

Published on: Mar 01, 2022 08:10 PM