Special Report | Russia-Ukraine युद्धाचा 9 वा दिवस, उध्वस्त घरं, हल्ले तीव्र -Tv9

Special Report | Russia-Ukraine युद्धाचा 9 वा दिवस, उध्वस्त घरं, हल्ले तीव्र -Tv9

| Updated on: Mar 04, 2022 | 10:16 PM

मिसाईल हल्ले, लढाऊ विमानांमधून बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारामुळे यूक्रेनमधील कीव, खार्कीवसह अनेक शहरांमधील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले, अनेक घरं आगीच्या भक्षस्थानी पडली, तर लहान मुलांसह शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले.

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धामुळे  यूक्रेनमधील शहर बेचिराख झाली आहे. मिसाईल हल्ले, लढाऊ विमानांमधून बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारामुळे यूक्रेनमधील कीव, खार्कीवसह अनेक शहरांमधील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले, अनेक घरं आगीच्या भक्षस्थानी पडली, तर लहान मुलांसह शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक कुटुंब यूक्रेन सोडून गेली आहेत. त्यामुळे गावं, शहरं ओस पडल्याचं पाहायला मिळतंय. तर अनेक नागरिक आपल्या लष्कराच्या मदतीसाठी हाती बंदूक, पेट्रोल बॉम्ब घेऊन रशियन सैन्याविरोधात युद्धभूमीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. असे अनेक व्हिडीओ सध्या विविध माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. तसंच सोशल मीडियावरही हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असेच हृदय पिळवटून टाकणारे काही व्हिडीओ आपण याठिकाणी पाहणार आहोत.