Russia Ukraine crisis: कीव शहरावर हल्ला करण्याची रशियन सैन्याची तयारी

Russia Ukraine crisis: कीव शहरावर हल्ला करण्याची रशियन सैन्याची तयारी

| Updated on: Mar 01, 2022 | 12:24 PM

युक्रेनची राजधानी कीववर (Kyiv) वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे.

Russia Ukraine crisis: युक्रेनची राजधानी कीववर (Kyiv) वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे. रशियानं युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता तर चक्क 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा (Russian troops) हा कीवच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसून आलं आहे. याआधीची एक ताफा रशियानं कीवच्या दिशेनं पाठवला होता. तो तीन मैल लांब होता. मात्र आताचा हा ताफा दुप्पटच नाही तर, तब्बल दहा पटपेक्षाही जास्त मोठा आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये तणाणावर चर्चाही करण्यात आली होती. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता.