Russia – Ukraine युध्दाला सुरुवात , Ukraine मध्ये आणीबाणी जाहीर
हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं वाद चिघळू लागला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी जागतिक स्तरावर युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर घडत असून ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्या संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला या दोन दिशांमधील मुद्दा आता युद्धाचे ढग अधिक गडद करतो आहे. गुरुवारी वेगवेगळ्या जागतिक वृत्तसंस्थांनी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला असल्याचं म्हटलंय. रशियाचे राष्ट्रपती वाल्मादिर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे अधिकच आक्रमक झालेत. युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेलेत. मात्र युक्रेनला पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो (NETO) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं वाद चिघळू लागला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी जागतिक स्तरावर युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर घडत असून ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.