Russia Ukraine War | रशिया - युक्रेन युध्दासंबंधी झटपट बातम्या

Russia Ukraine War | रशिया – युक्रेन युध्दासंबंधी झटपट बातम्या

| Updated on: Feb 26, 2022 | 2:34 PM

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील (Kyiv) हवाई पट्ट्या (Fighting on the Streets) काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने नागरिकांना सावधान आणि सतर्क राहण्याचा व बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही जर घरात असाल तर तिथेच लपून राहा, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करुन घ्या, बाल्कनीमध्ये जाऊ नका अशा सूचना कीव प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Published on: Feb 26, 2022 01:45 PM