Special Report | युद्धाचे 10 दिवस उलटले. Ukraine चं पुढं काय होणार?

Special Report | युद्धाचे 10 दिवस उलटले. Ukraine चं पुढं काय होणार?

| Updated on: Mar 05, 2022 | 8:45 PM

गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घमासान युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन (Vladimir Putin) काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घमासान युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन (Vladimir Putin) काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियावर निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. युक्रेनला बर्बाद (Russia Ukraine Crisis) करण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे वक्तव्य आज पुतीन यांनी केले आहे. सैनिकांच्या मुख्य ठिकाणांना पुतीन यांनी टार्गेट करून संपल्याचे यावेळी सांगितलं आहे. युक्रेनमधील रशिय सैन्य सध्या हाय अलर्टवर असल्याचेही पुतीन यांनी यावेळी सांगितले आहे. ब्रिटेनच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सैनिकांना हाय अलर्टवर ठेवल्याचे सागण्यात येत आहे. हे युद्ध सुरू करणे हा आमच्यासाठी कठीण निर्णय होता, असेही ते म्हणाले आहेत. डोनवॉत्सक शहर रशियाला दिल्यास शांतता प्रस्थापित होईल. 2013 पासून या शहरात 13 ते 14 हजार नागरिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. आज काहीशी शांतता प्रस्थापित होत असली तरी रशियन सैन्याकडून काही ठिकाणी फायरिंग होत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. विमान पाडल्याच्याही काही बातम्या समोर आल्या आहेत. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच पुतीन यांचे हे वक्तव्य समोर आल्याने युक्रेनचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.

Published on: Mar 05, 2022 08:30 PM